डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतला ‘ मोठा निर्णय ‘, पुढील पाच वर्षे आता .. 

शेअर करा

खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढील पाच वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयाला पूर्णपणे रामराम करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत. 

खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर गायब झालेले खासदार , नटसम्राट असे शिक्के विरोधकांनी लावलेले होते. निवडणुकीच्या प्रचारात खासदाराचे काम ‘ दिल्लीत असते गल्लीबोळात नसते ‘ असे सांगण्याचा अमोल कोल्हे यांनी प्रयत्न देखील केला मात्र अखेर त्यांनी पाच वर्ष अभिनयाला रामराम करण्याची घोषणा केलेली आहे. 

अमोल कोल्हे म्हणाले की , ‘ माझ्या विरोधात प्रचार करण्याचा कोणताही मुद्दा विरोधकांकडे शिल्लक राहिलेला नाही. मागची पाच वर्षे निस्वार्थी भावनेने काम केलेले आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे कारण जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी लागावीत आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी अभिनयाला पाच वर्ष पूर्णविराम देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे ‘, असे ते पुढे म्हणाले. 


शेअर करा