वयाच्या साठीनंतर का होईना पण स्वातंत्र्य मिळालं , काय म्हणाले अजित पवार ? 

शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर तालुक्यात केंदूर इथे बोलताना , ‘ भाजपसोबत जाण्याचा निर्णय 2019 मध्ये झालेला होता मात्र पवार साहेबांनी माघार घेतली आणि झालेल्या धरसोडीमध्ये मी भाजपसोबत गेलो आणि 72 तासासाठी उपमुख्यमंत्री देखील झालो. अशी धरसोड घातक आहे असे सांगून देखील त्यांचा हट्ट संपत नव्हता. मी त्यांचा मुलगा असतो तर असे निर्णय त्यांनी घेतले असते का हे समजत नाही ? ‘ असे म्हटलेले आहे . 

अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूर तालुक्यातील केंदूर येथे सभा घेतली त्यावेळी ते म्हणाले की , ‘ शिरूरच्या बारा गावांचा दुष्काळ संपवून टाकू. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नाने सर्वेक्षणाचे देखील आदेश झालेले आहेत. निधीची चिंता तुम्ही करू नका मतदान मात्र शिवाजीराव आढळराव यांनाच करा , ‘ असेही आवाहन त्यांनी केले आहे . 

अजित पवार पुढे म्हणाले की , ‘ 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी असताना देखील पवार साहेबांनी ती नाकारली. सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा पुढे करत पवार साहेबांनी काँग्रेस सोडली आणि 2019 मध्ये भाजपसोबत जायचे ठरवले आणि माघार घेतली. मी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ७२ तासांसाठी उपमुख्यमंत्री देखील झालो. धरसोड प्रवृत्ती घातक असल्याचे मी त्यांना सांगितले मात्र साहेबांचा हट्ट संपत नव्हता या सर्व घडामोडी वैतागून मी अखेर निर्णय घेतला आणि आज तुमच्यापुढे उभा आहे . वयाच्या साठीनंतर का होईना आम्हाला आमच्या निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले , ‘ असेही ते पुढे म्हणाले


शेअर करा