…. आणि ऐनवेळेस पोलिसांपुढे तरुणीने बदलला जबाब त्यानंतर युवकाने केले ‘ असे काही ‘

शेअर करा

सर्व समाजाचा विरोध असताना त्यांनी पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न तर केले मात्र अखेर त्यांना पकडल्यानंतर प्रेयसीने अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये जबाब बदलला त्यामुळे हताश झालेल्या युवकाने पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद इथे समोर आली आहे. शहरातील हुसेन कॉलनी येथील एका तरुणाने दहा दिवसांपूर्वी प्रेयसीसोबत पळून जावून लग्न केले होते मात्र पोलीस स्टेशनमध्ये प्रेयसीने जबाब बदल्यामुळे तरुणाची उरली सुरली हिंमत देखील संपली आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. After inter-religious marriage, the young woman changed her answer at the police station aurangabad

उपलब्ध माहितीनुसार, तौफिक शेख अहमद शेख (वय 21) असं या तरुणाचे नाव आहे. तौफिक दहा दिवसांपूर्वी विशालनगर इथं राहणाऱ्या तरुणीसोबत पळून गेला होता त्यानंतर दोघांनी धार्मिक पद्धतीने लग्न केले होते. पण लग्न झाल्यानंतर दोघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. लग्न तर केले पण पुढे कुठे जायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अखेर त्यांनी ओळखीतील लोकांशी चर्चा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

तौफिक आणि तरुणी बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तरुणी ही विशालनगर भागात राहणारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वाळूज पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर तौफिक आणि या तरुणीला पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांना देखील बोलवण्यात आले होते. तरुणी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या आई वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

पोलीस स्टेशनमध्ये तौफिक आणि तरुणी पोहोचल्यानंतर आई वडिलांनी आपल्या मुलीची समजूत काढली. दहा दिवसांपासून तौफिकसोबत बाहेर राहिल्यामुळे तरुणी हादरलेली होती. आई-वडिलांनी समजूत काढल्यानंतर तरुणीने आपला विचार बदला आणि तौफिकसोबत जाण्यास नकार दिला. तरुणीने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे तौफिकला मोठा धक्का बसला. त्याने थेट पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


शेअर करा