‘ निलेश लंके किस झाड की पत्ती निकालानंतर समजेल ‘, अजित पवारांवर टीका 

शेअर करा

‘ निलेश लंके किस झाड की पत्ती है हे मतमोजणीनंतरच अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजेल ‘ असा टोला आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर मारलेला आहे. ‘ निलेश लंके किस झाड की पत्ती ‘ असा शब्द अजित पवार यांनी पारनेर इथे बोलताना लंके यांच्या संदर्भात वापरलेला होता. 

निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पाथर्डी इथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की , ‘ दादांची भाषा हल्ली फारच बदललेली आहे. बारामतीच्या निवडणुकीचा हा परिणाम झालेला असावा. तुम्ही कितीही मोठे पैलवान असला तरी ज्येष्ठ नेते शरद पवार हे वस्ताद आहेत. एक डाव हातचा राखून वस्ताद शिकवत असतो हे मोठ्या पैलवानाने समजून घ्यावे .’ 

पाथर्डी तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष झालेले असताना स्थानिक प्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नाहीत. मागच्या निवडणुकीच्या वेळी विखे तुम्हाला पिस्तूल हवे की विकास अशी भाषा वापरत होते मात्र या निवडणुकीत ते स्वतःच गाडीत पिस्तूल घेऊन बसलेले आहेत , ‘ अशीही टीका रोहित पवार यांनी केलेली आहे .


शेअर करा