रविवारी 7712452176 नंबरवरून मोदींचा फोन , निवडणूक आयोग कारवाई करणार का ? 

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यात काल संध्याकाळीच प्रचार थंडावलेला असला तरी आज रविवारी 12 तारखेला देखील वेगवेगळ्या नंबरवरून फोन येऊन प्रचाराचे आवाहन करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ७७१२४५२१७६ या नंबरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाचा फोन येऊन भाजपसाठी मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. काल अशाच पद्धतीने भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या नावाने नागरिकांना फोन सुरू होते आणि फोनच्या शेवटी जय श्रीराम असा देखील मेसेज दिला जात होता. धर्माच्या नावाने मते मागणे आणि प्रचार थांबलेला असताना असे फोन येणे असे प्रकार सर्रासपणे सुरु असून त्यावर कुठलीही कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत तरी समोर आलेले नाही. 

देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी 13 तारखेला चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होत असून सर्व ठिकाणी सध्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार थांबलेला आहे. नगर शहरासह जिल्हाभर पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी सक्रिय झालेली असून पुढील दोन दिवस सायबर पोलीस सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष ठेवून आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या थांबलेला असला तरी सोशल मीडियावर मात्र प्रचार कसा रोखावा हे देखील आव्हान सायबर यंत्रणेपुढे आहे. पोलिसांची स्वतंत्र टीम यासाठी कार्यरत करण्यात आलेली असून व्हाट्सअप ग्रुपवर , धार्मिक ग्रुपवर तसेच फेसबुक व इतर सोशल सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. फोटो मार्फ करणे , एकमेकांवर वैयक्तिक टीका करणे, खोटी माहिती प्रसारित करणे अशा स्वरूपाच्या सर्व बाबींवर सध्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर टीम सक्रिय आहे . 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपल्यानंतर मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच अनेक उमेदवारांच्या यंत्रणा सक्रिय झालेल्या आहेत. दिवसाचा प्रचार थांबला असला तरी रात्रीच्या भेटीगाठी तसेच सोशल मीडियावरील गप्पा यावर देखील पोलिसांचे लक्ष आहे. 


शेअर करा