एका बॅगेत पाच महिन्याचे जिवंत बाळ, पाच हजार रुपये आणि एक ‘ अशीही ‘ चिठ्ठी : काय लिहले आहे चिठ्ठीत ?

शेअर करा

एका 5 महिन्याच्या मुलाच्या बापाला कौटुंबिक वादामुळे आपल्या मुलाला बेवारस सोडून जाण्याची वेळ आली मात्र या बापाने बाळाला सोडून देताना एक भावस्पर्शी अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात त्याने जे काही लिहिलंय ते वाचून तुमचे डोळेही पाणावतील. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील ही घटना असून या चिठ्ठीच्या सोबत पाच हजार रुपये देखील मिळून आले आहेत. बापाने आपल्या पाच महिन्यांच्या मुलाला एका बॅगेत भरलं आणि एक भावुक चिठ्ठीही बाळासोबत ठेवली. A five-month-old baby in a bag and five thousand rupees and an note in Amethi Uttar pradesh

चिठ्ठीत लिहिलं होतं की, ” मी पैसे पाठवत राहिन. काही महिन्यांसाठी माझ्या बाळाला सांभाळा. हा माझा मुलगा आहे. मी तुमच्याकडे याला सहा-सात महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे म्हणून माझा मुलगा मी तुमच्याकडे सोडत आहे. मी 5000 रुपये प्रत्येक महिन्याला पाठवत राहिन. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, कृपया माझ्या बाळाला सांभाळा. माझी अडचण आहे. या बाळाला आई नाही. माझ्या कुटुंबात बाळाला धोका आहे. यासाठी 6-7 महिने तुमच्याकडे सोडत आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मी बाळाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा “

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून हे प्रकरण समोर आलं आहे. अमेठी पोलिसांना हे पाच महिन्यांचं बाळ एका झोल्यात सापडलं आहे. मुशीगंज भागात पोलिसांनी हे बाळ सापडलं आहे. बॅगेत बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर पीआरवीनी याबाबत सूचना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. यावेळी एका बॅगेत बाळ रडत होतं. पोलिसांनी सांगितले की, बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर कंट्रोल रुमला याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांच्या टीमने जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा बाळासह कपडे, शूज, 5 हजार रुपये आदी गरजेच्या वस्तू होत्या. यासोबत एक चिठ्ठीदेखील मिळाली. ही चिठ्ठी बाळाच्या वडिलांनी लिहिल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून या बाळाला कुटुंबातूनच धोका असल्याने हताश बापाने हे पाऊल उचलले असल्याची परिसरात चर्चा आहे.


शेअर करा