आजची रात्र अत्यंत महत्त्वाची , पोलीस बांधवांवरील जबाबदारी खूप वाढलीय कारण.. 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने एक राजकीय पक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय असून वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक मोर्चे काढत शहरातील वातावरण तापवण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात आलेले आहेत.  शेवटच्या दोन दिवसात निवडणूक फिरवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका यंत्रणेच्या मार्फत काही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे सोबतच अफवा रोखण्याचे देखील आवाहन पोलीस प्रशासनासमोर आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर शहरातील वातावरण चिघळत ठेवण्याचे काम या पक्षाने केलेले आहे मात्र एकतेचा मोठा इतिहास असलेल्या नगरकरांनी आत्तापर्यंत असे सर्व प्रयत्न हाणून पाडलेले आहेत आणि त्यासाठी नगरकरांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. उद्या मतदानाचा दिवस असून या दिवशी गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस बांधवांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे सोबतच सोशल मीडियावरील अफवांवर देखील नियंत्रण ठेवत कठोरात कठोर कारवाई तात्काळ करण्याची गरज आहे.

आमची यंत्रणा अवघ्या दोन दिवसात संपूर्ण प्रचार फिरू शकते त्यासाठी कुठलीही पातळी गाठण्याची तयारी या यंत्रणेने केलेली असली तरी सुज्ञ नगरकर आता त्याच्या पलीकडे विचार करू लागलेले आहेत. सोशल मीडियावरील अफवा रोखण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनासमोर आहे तर दुसरीकडे अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झालेली आहेत त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार कशी ? हा देखील एक प्रश्न आहे.


शेअर करा