सुजय विखे यांची ‘ यंत्रणा ‘ पारनेर तालुक्यात पैसे वाटताना धरली , निलेश लंके म्हणाले की.. 

शेअर करा

पारनेर तालुक्यातील वडझिरे इथे सुजय विखे यांच्यासाठी पैसे वाटप करताना काही महिलांनी कार्यकर्त्यांना पकडून दिलेले असून त्यांच्याकडून सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. नगर शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला  झालेला होता आणि विशेष बाब म्हणजे हा प्रकार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील काही व्यक्तींनी केल्याचा अंदाज आहे. आमदार निलेश लंके यांनी यानंतर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत . 

पारनेर तालुक्यातील वडझिरे इथे पैसे पकडण्यात आल्यानंतर निलेश लंके यांनी , ‘ त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे त्यामुळे ते असे प्रकार करत आहेत ,’ असे म्हटलेले आहे. नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुजय विखे यांच्या पैसे वाटपाची जोरदार चर्चा सुरू असून वडझिरे इथे पैसे पकडण्यात आल्यानंतर विखे कुटुंबीयांकडून निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्या थराला त्यांची यंत्रणा कार्यरत आहे हे देखील या निमित्ताने उघड झालेले आहे . 

निलेश लंके यांनी अधिक माहिती देताना , ‘नगर शहरातील व्यापाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून सुजय विखे यांना निवडून देण्यासाठी धमकवण्यात येत आहे ‘, असा आरोप केलेला आहे.  ‘ शहरातील काँग्रेस नेते दीप चव्हाण यांच्या घरी मी गेलो मात्र मी घरी गेल्यानंतर पीएसआय असलेल्या व्यक्तीने चक्क दीप चव्हाण यांच्या घरात प्रवेश केला ‘ याविषयी देखील लंके यांनी संताप व्यक्त करत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात कशा पद्धतीने शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग विखे यांच्याकडून करण्यात येत आहे याविषयी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. 

आमची यंत्रणा अवघ्या दोन दिवसात संपूर्ण प्रचार फिरू शकते त्यासाठी कुठलीही पातळी गाठण्याची तयारी या यंत्रणेने केलेली असली तरी सुज्ञ मतदार आता त्याच्या पलीकडे विचार करू लागलेले आहेत. सोशल मीडियावरील अफवा रोखण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनासमोर आहे. पैसे वाटून मते मिळतील अशी परिस्थिती आता राहिलेली नाही नागरिकांची मानसिकता आता त्याही पुढे गेलेली असून आधी पैसे येऊ द्या मग बघू अशी मानसिकता बनलेली आहे त्यामुळे पैसा कितपत कामाला येईल हा देखील वेगळा विषय आहे. 


शेअर करा