अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया आज पार पडलेली असून 3734 मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली होती. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेने पार पडलेले असून सर्व मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त होता. नागरिकांनी रांगेत उभे राहून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर शहर येथे 54.50% श्रीगोंदा 51.24% पारनेर 46.60% राहुरी 56.20% शेवगाव 54.18% आणि कर्जत जामखेड 57.20% अशी मतदानाची टक्केवारी होती तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.27% मतदान पार पडले होते.
महाराष्ट्रातील इतर मतदारसंघात देखील चौथ्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे होती नंदुरबार 60.60 %, जळगाव 51.98 %, रावेर 55.36% ,जालना 58.85% औरंगाबाद 54.02 %, मावळ 46.03%, पुणे 44.90%, शिरूर 43.89%, बीड 58.21%. पुणे जिल्ह्यातील मतदानाची कमी टक्केवारी ही चिंतनीय आहे.