निलेश लंके म्हणजे फक्त सोशल मीडियावरील वादळ , राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की..

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची कडवी टक्कर सुरु असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘, निलेश लंके म्हणजे फक्त सोशल मीडियावरील वादळ आहे ते वास्तव नाही ‘ असे म्हटलेले आहे. 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , ‘ निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ आहे. खरं वास्तव जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे मात्र असं असली तरी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवावी लागते. सोशल मीडियातून एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु आता खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. 

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की , ‘ निलेश लंके यांचा चेहरा हा झुंडशाहीचा, गुंडशाहीचा, हप्तेखोरीचा आहे. शरद पवार यांनीही असेच लोक आयुष्यभर सांभाळले आहेत. जनतेचा विश्वासघात करून त्यांनी कायम सत्तास्थानं मिळवली आहेत. विरोधी उमेदवाराला स्वत:बद्दल सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही त्यामुळे आमची बदनामी केली जात आहे. आपली गुंडगिरी, हप्तेखोरी, परप्रांतीयांना एमआयडीसीमध्ये नोकरीत प्राधान्य, हे सगळं पाप झाकण्यासाठी त्यांच्याकडून आमच्यावर पैसे वाटल्याचे आरोप केले जात आहेत ‘ असेही ते पुढे म्हणाले. 


दुसरी बाब अशी की  मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पारनेर तालुक्यातील वडझिरे इथे सुजय विखे यांच्यासाठी पैसे वाटप करताना काही महिलांनी कार्यकर्त्यांना पकडून दिलेले असून त्यांच्याकडून सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुजय विखे यांच्या पैसे वाटपाची जोरदार चर्चा सुरू असून वडझिरे इथे पैसे पकडण्यात आल्यानंतर विखे कुटुंबीयांकडून निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्या थराला त्यांची यंत्रणा कार्यरत आहे हे देखील या निमित्ताने उघड झालेले आहे . 


शेअर करा