संपूर्ण घरात कोंबडीच रक्त आणि मुलगी गायब ,  नगर जिल्ह्यात भलतंच प्रकरण समोर

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आई सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला आणि घरातील मुलगी गायब झालेली असे चित्र तिच्या लक्षात आले . काही क्षणातच ग्रामस्थ देखील जमा झाले आणि पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले मात्र त्यानंतर जे काही समोर आले ते कल्पनेच्या पलीकडचे होते. 

मुलगी सापडेना म्हणून आई-वडिलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही आणि काही वेळातच मुलीला बिबट्याने पळवल्याची चर्चा सुरू झाली मात्र पोलीस आल्यानंतर जे काही रक्त दिसून आले ते कोंबडीचे असल्याचे समोर आले आणि काही रक्त कुंकू पाण्यात मिक्स करून तिथेच टाकण्यात आलेले होते ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. 

आपली मुलगी बिबट्याने नेली या भीतीने आई-वडील या दोघांनीही टाहो फोडला मात्र रक्त कोंबडीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची बाब समोर आली. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलीनेच त्याच्या मदतीने हा प्रकार केल्याचे अखेर उघडकीस आले असून 11 मे 2024 रोजी ही घटना अकोले तालुक्यातील हिवरगाव इथे घडलेली आहे. 

शेळ्या मेंढ्या चालण्याच्या संपर्कातून मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलासोबत झालेली होती आणि संगनमताने ते पळून गेले. मुलगी पळून गेल्याची बाब लक्षात येताच हतबल झालेल्या वडिलांनी एक दोरी आणून झाडाला गळफास घेतला आणि उडी मारली मात्र गळ्याला जोरदार दणका बसल्याने त्यांचा यात मृत्यू झालेला आहे . झाल्या प्रकाराबाबत संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


शेअर करा