रस्त्याच्या कामासाठीची कच चोरत असताना ठेकेदार दिसला पण.., राहुरीतील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहुरी तालुक्यात समोर आलेली असून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे रस्त्याच्या कामासाठी बाजूला टाकलेली कच चोरण्यासाठी विरोध केल्यानंतर ठेकेदाराला शिवीगाळ आणि मारहाण करत गावठी पिस्तूल डोक्याला लावून धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. राहुरी पोलिसात सात जणांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , महेश चंद्रकांत गायकवाड ( वय 32 वर्ष ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ते टाकळीमिया येथील रहिवासी आहेत. शासकीय रस्त्याच्या कामासाठी देशमुख वस्ती इथे रस्त्यावर कच टाकलेली होती . माऊली भागवत सोमा भागवत आणि इतर पाच जण ही कच चोरून नेण्याचा प्रयत्न करत होते. 

रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार सुरू असताना फिर्यादी व्यक्ती तिथे पोहोचले त्यावेळी त्यांनी या प्रकाराला विरोध केला त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी आणि खोऱ्याने मारहाण करत गावठी पिस्तूल डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले. चारचाकी वाहनातील 20000 रुपये देखील आरोपींनी काढून घेतले असे आरोप त्यांनी केलेला असून राहुरी पोलिसात सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 


शेअर करा