नगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर ,  दोन्ही मतदार संघात किती मतदान ? 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर झालेली असून अहमदनगर दक्षिण मतदार संघात 61 % तर शिर्डीमध्ये 62% मतदान झालेले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ही मतांची टक्केवारी जाहीर केलेली आहे.मागील निवडणुकीच्या तुलनेत ही घट असून सत्ताधारी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. 

उत्साही मतदारांनी रांगेत राहून मतदान केले आणि त्यानंतर निळ्या शाईसोबत स्वतःचा सेल्फी फोटो व्हाट्सअप स्टेटसवर ठेवलेला होता. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे , महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्यात चुरशीची लढत झालेली आहे. अहमदनगर मतदारसंघात 25 तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात होते.


शेअर करा