‘ त्यांचा काय संबंध ? ‘ , छगन भुजबळ यांचा भाजपला घरचा आहेर

शेअर करा

प्रत्येक अपयशासाठी इतरांना जबाबदार धरण्याची भाजपची खोड अद्यापही जात नसून मुंबईत होर्डिंग कोसळल्या कारणाने 14 जणांचा मृत्यू झाला त्याविषयी नेहमीप्रमाणे भाजपकडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जबाबदार धरण्यात आले त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला ‘ या प्रकरणात त्यांचा काय संबंध ? ‘ अशा शब्दात घरचा आहेर दिलेला आहे. 

एकीकडे होर्डिंग कोसळल्यानंतर कुटुंबीय दुःखात असताना दुसरीकडे भाजपकडून या प्रकाराचे राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण मुंबई या घटनेने हादरून गेलेली असल्याकारणाने रोड शो करू नये असा देखील एक मतप्रवाह होता मात्र मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केलेले असून आज त्यांचा रोडशो आज मुंबईत होणार आहे

होर्डिंगच्या कंपनीचा मालक भावेश भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचे एक छायाचित्र राम कदम यांनी पोस्ट करत ठाकरे यांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावर छगन भुजबळ यांनी ‘ सरकार आमचे आहे महापालिकासुद्धा सध्या आमचीच आहे त्यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध ? ‘ असा खडा सवाल केलेला आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की , ‘ राज्यात आमचे सरकार आहे. मुंबई महापालिका देखील आमच्याच ताब्यात आहे मग त्या होर्डिंग प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे ?. राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येतात छायाचित्रे देखील काढतात त्यामुळे या प्रकरणात कृपया राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. अनधिकृत होर्डिंगची चौकशी करावी आणि प्रशासकीय संस्थांनी त्यावर कारवाई करावी , ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा