मुंबईतील घटनेनंतर अहमदनगर महापालिका खडबडून जागी ,  ‘ त्या ‘ व्यक्तींवर कारवाई होणार का ? 

शेअर करा

मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 14 जणांचा मृत्यू झालेला असून अहमदनगर महापालिका देखील यानंतर खडबडून जागी झालेली आहे. नगर शहरात अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने होर्डिंग लावण्यात आलेले असून होर्डिंग प्रक्रियेवर महापालिका प्रशासनाचे कुठलेच लक्ष नाही. 

छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येक होर्डिंगवर क्यू कोड असून तो स्कॅन केल्यानंतर होर्डिंग कुणाच्या मालकीचे आहे त्या संदर्भातील मुदत वगैरे संपूर्ण माहिती त्या व्यक्तीला प्राप्त होते मात्र नगर शहरात अशी प्रक्रिया क्वचितच काही ठिकाणी दिसून येते. मुंबईप्रमाणे नगरमध्ये देखील अपघाताची भीती असल्याकारणाने सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलेले आहेत. नगर चौफेरने सुमारे दीड वर्षांपूर्वीच यासंदर्भात वृत्त दिलेले होते. 

नगर शहरात काही ठिकाणी महापालिकेने परवानगी दिल्यानंतर काही खाजगी जागांवर होर्डिंगसाठी स्पॉट विकसित करण्यात आलेले आहेत मात्र अनेकदा महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करत शहरात खाजगी जागांवर होर्डिंग बेकायदेशीर देखील उभारण्यात आलेले आहेत. महापालिकेचे अधिकारी अर्थपूर्ण कारणाने त्याकडे दुर्लक्ष करतात अशीही शहरात चर्चा आहे. 

होर्डिंग उभारल्यानंतर होर्डिंगचे बेसिक स्ट्रक्चर काय आहे याकडे कुणाचेही लक्ष नाही . नगर शहरातील सक्कर चौक डीएसपी चौक पत्रकार चौक माळीवाडा बस स्टॅन्ड बोल्हेगाव अशा ठिकाणी उंच उंच होर्डिंग उभारण्यात आलेली आहे मात्र त्यासाठी करण्यात आलेली स्ट्रक्चर नियमाला धरून आहेत का ? याकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही . 


शेअर करा