इंदिरा गांधींनी तर पाकिस्तानचे तुकडे केले , कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही ? 

शेअर करा

डीआरडीओचा माजी संचालक प्रदीप कुरुलकर याने देशाच्या सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे उघड झाल्यानंतर जरी त्याला तुरुंगात झालेला असला तरी त्याच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही , असा प्रश्न काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केलेला आहे.

पुणे येथे बोलताना गोपाळ तिवारी म्हणाले की , ‘ काँग्रेस नेते इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. काँग्रेसचा यंदाच्या निवडणुकीत विजय झाला तर पाकिस्तानमध्ये आनंद उत्सव साजरा होईल अशा जाहिराती भाजपकडून करण्यात येत आहेत . काँग्रेसचा ओढा पाकिस्तानकडे असल्याचा आरोप केला जातो मात्र वस्तुस्थितीत मोदी प्रणित भाजपचा पाकिस्तानकडे ओढा आहे , ‘ असे ते पुढे म्हणाले .


शेअर करा