‘ आम्हाला निवडून दिलं नाही तर..’ , नितेश राणे यांची मतदारांना धमकी 

शेअर करा

‘ आम्हाला निवडून दिलं नाही तर तुमची कामे होणार नाहीत ‘ हा भाजपच्या नेत्यांचा अहंकार पुन्हा एकदा दिसून येत असून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अशाच स्वरूपाचे वक्तव्य नालासोपारा इथे बोलताना केलेले आहे . 

नितेश राणे म्हणाले की , ‘ तुमची कामे लवकर होण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या नाहीतर केंद्र आणि राज्यातून लोकांची कामे होणार नाहीत. भाजप खासदारांची कामे सहा तासात तरी इतर उमेदवारांना मात्र सहा महिने थांबावे लागेल , असेही ते पुढे म्हणाले. नितेश राणे म्हणाले की हिंदू राष्ट्र करणे हेच भाजपचे ध्येय आहे त्यासाठी मोदींना मत देणे हाच पर्याय आहे असे ते पुढे म्हणाले.


शेअर करा