‘ शुभमंगल सावधान ‘ होण्याच्या आधीच नवरीचे दागिने गायब , नगर तालुक्यातील घटना

शेअर करा

नगर तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून लग्नसोहळ्यात नवरीला घालण्यासाठी आणलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लग्नातून लंपास केलेला आहे. नगर तालुक्यातील शिराढोण इथे ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आसराबाई रघुनाथ मेहत्रे ( राहणार अकोळनेर तालुका नगर ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून त्यांच्या भावाच्या मुलाचे शिराढोण येथे लग्न होते. नवरी मुलीला घालण्यासाठी कुटुंबीयांनी सोन्या चांदीचे दागिने केलेले होते आणि सांभाळण्यासाठी ते फिर्यादी महिला यांच्याकडे देण्यात आलेले होते.

फिर्यादी महिला यांच्याकडे सोन्याचे गंठण , कानातील टॉप्स , पायातील चांदीचे जोडवे आणि काही रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज जवळ होता मात्र लग्न सोहळ्याची गडबड सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग चोरली आणि हा ऐवज गायब झाला. पोलीस निरीक्षक रणजीत मारक याप्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा