मोदीजी आता फक्त तुमच्या अंगात यायचं बाकी राहिलंय ,  पंतप्रधानपदाची थोडीतरी ?

शेअर करा

सर्वसामान्य नागरिकांच्या दुःखांशी आणि प्रश्नांशी भाजपला सध्या काहीच घेणेदेणे राहिलेले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांचा प्रचार हा सातत्याने हिंदू मुस्लिम पाकिस्तान चीन ट्रिपल तलाक हलाला गाय गोबर गोमूत्र आणि काश्मीर यांच्या पलीकडे सरकायला तयार नाही. धार्मिक मुद्द्यांवर वातावरण तापवण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्याकडून सातत्याने होत असून मोदी यांची वेशभूषा आणि भाषणाची पद्धत पाहता हिंदू मुस्लिम मुद्द्यांशिवाय भाजपला कुठलाही पर्याय दिसत नाही हे स्पष्ट आहे. 

सर्वसामान्य नागरिक महागाई अन बेरोजगारी या दोन मुख्य प्रश्नांनी सध्या सर्वाधिक त्रस्त असताना या प्रश्नांवर उत्तर देणे अवघड असले कारणाने नागरिकांना धार्मिक मुद्द्यांच्या भोवतीच गुरफटण्याचा भाजपचा प्रचार अजेंडा दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांचे पदाला साजेशे असे भाषण वास्तविक धर्मनिरपेक्ष पद्धतीचे असावे मात्र मोदी यांची वेशभूषा आणि भाषणे पाहिली तर देशाने नक्की पंतप्रधान निवडला होता की कोणी बाबा फकीर असा प्रश्न मतदारांना उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. 

अहमदनगर ते बीड 120 किलोमीटरच्या अंतरावर नरेंद्र मोदी यांच्या नगरच्या सभेचा लुक वेगळा होता तर बीडच्या सभेत लूक वेगळा होता. इतका नट्टाफट्टा करून नागरिकांना भुलवण्यासाठी कधी वारकरी कधी फेटेवाले बाबा अशा वेशभूषांचा आधार नक्की कशासाठी घ्यावा लागतो ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही . एखाद्या लहान मुलासारखा कॅमेऱ्याचा नाद असणे , वेगवेगळे कपडे घालून मिरवणे , स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे असे सर्व बालिश प्रकार मोदी सत्तेत आल्यानंतर सुरू झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारणारे कोणी नसल्याकारणाने त्यात सुधारणा होण्याची देखील अपेक्षा राहिलेली नाही अन विशेष म्हणजे इतके सर्व प्रकार करूनही कोडगेपणाने मोदी आपण हिंदू मुस्लिम राजकारण करत नाहीत असेही भाषणात म्हणतात. पंतप्रधान मोदी यांचा प्रचार असाच राहिला तर येत्या काही दिवसात स्टेजवर अंगात आल्याचा देखील चमत्कार मोदी यांनी केला तर त्याविषयी देखील काही वावगं वाटू नये इतपत प्रचाराची पातळी खाली गेलेली आहे. 

अबकी बार ४०० पारचा नारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी संविधान बदलण्याबाबत वक्तव्ये केली आणि काँग्रेसने 400 पार यांना संविधान बदलण्यासाठी हवे आहे असा आरोप केला त्यानंतर भाजप नेत्यांना पळता भुई थोडी झालेली आहे.  संविधान बदलणे हा शब्दच मुळात नागरिकांच्या हक्कांवर मर्यादा आणणारा असल्याने भाजपवर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती एससी एसटी आणि ओबीसी समाजबांधवांची राहिलेली नाही. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना मोदी यांना जे काही करायचे आहे ते आधी खालच्या फळीतील लोकांकडून बोलवून त्यानंतर अमलात आणले जाते अशी भाजपची नीती असल्याचे सांगितले होते . 

भाजप नेते अनंत हेगडे यांनी मार्च २०२४ मध्ये ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे कारण आम्ही संविधान बदलू शकू  ‘ असे म्हटलेले होते. दोन एप्रिल 2024 रोजी ज्योती मिर्धा ज्या सध्या भाजपच्या तिकिटावर राजस्थानमधून निवडणूक लढवत आहेत त्यांनी देखील प्रचारादरम्यान ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे की संविधान बदलणे शक्य होईल ‘ असे म्हटले होते.  उत्तर प्रदेशातील मेरठ इथून भाजपच्या तिकिटावर उभे असलेले रामायणातील रामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांना देखील या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळी त्यांनी ‘ संविधान बदलायचे असेल तर त्यात चूक काय आहे’ असा प्रतिप्रश्न केलेला होता आणि फैजाबाद भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी एका बैठकीत ‘ चारशे पार याच्यासाठी पाहिजे कारण संविधान बदलले जाऊ शकेल ‘  असे म्हटलेले होते.  भाजप नेत्यांची ही वक्तव्य सध्या पक्षासाठी प्रचंड अडचणीची ठरलेली आहेत. 

‘ अबकी बार चारसो पार ‘ हा नारा भाजपने त्यानंतर गुंडाळलेला दिसत असून पहिल्या चारही टप्प्यात कमी मतदान झाल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकली असल्याने त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण हा एकच पर्याय सध्या भाजपला दिसतो आहे .काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची गोष्ट आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्र वगैरे असे विषय जे काही घेतले ते जनतेला फारसे रुचलेले नाहीत.देशभरातील एससी एसटी आणि ओबीसी यांना भाजप सत्तेत येण्याचीच भीती वाटू लागली तर लोकांपर्यंत पोहचण्याची उरलेली कसर काँग्रेसच्या सभांमध्ये राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी भरून काढली. 

पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीची खिल्ली त्यांच्या वैवाहिक जीवनाशी जोडून देखील विरोधक उडवत आहेत. नवीन संसदेचे उद्घाटन असो वा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हिंदू धर्माच्या रीतीने अशा गोष्टी सपत्नीक करणे गरजेचे आहे मात्र तिथेही पंतप्रधान मोदी यांनी एकट्यानेच हे सोहळे पार पडले ही बाब देखील जनतेला रुचलेली नाही. भ्रष्टाचारावर आपण आक्रमक असल्याचा मोदी भाषणात आव आणतात मात्र त्यांच्याच स्टेजवर वेगवेगळ्या पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आयात नेते दिसून येतात. 

स्थानिक विषय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत मात्र स्थानिक विषयांना हात घालणे भाजपला अडचणीचे ठरत असल्याकारणाने राष्ट्रीय मुद्दे पुढे करून मताचा जोगवा मतदारांपुढे मागितला जात आहे . धार्मिक मुद्द्यांवरच भाजप आणि गोदी मीडिया सध्या लोळत पडलेली असून महागाई , बेरोजगारी, महिला सुरक्षा , चीनचे अतिक्रमण, महागडे होत चाललेले शिक्षण असे अनेक मुद्दे सध्या महत्त्वाचे आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे मेटाकुटीला आलेला असताना त्याला धार्मिक उपदेशाचे डोस आणि विद्वेषपूर्ण सल्ले आता नागरिकांच्या पचनी पडायला तयार नाहीत. 

अडचणीच्या ठिकाणी जायचेच नाही ( मणिपूर ) , आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायचे (काँग्रेस)  , यश मिळाले तर त्याचे क्रेडिट घेण्यासाठी सर्वप्रथम जायचे (चांद्रयान , अयोध्या मंदिर ) आणि गोदी मीडियाने त्याची टिमकी देशभरात वाजवायची अशा पद्धतीने गेली दहा वर्ष भाजपने सत्ता उपभोगलेली आहे. कोणी विरोध केला तर त्या व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबीयांवर देखील अत्यंत खालच्या पातळीवर टीका करायची त्याचे इतर कुठल्याही धर्मासोबत काहीतरी कनेक्शन शोधायचे आणि त्याचाच आधार घेत त्याचे खच्चीकरण करायचे याला आता जनता भीकच घालत नाही हे भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे मात्र सध्या विश्वगुरूच्या अहंकारात असलेल्या भाजपला खुर्ची गेल्याशिवाय जमिनीवरील परिस्थिती समजणार नाही.


शेअर करा