नवऱ्याने बायकोसाठी पार मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले आणि ‘ ती ‘ मात्र … ?

शेअर करा

पोटी दहा वर्षाचा मुलगा आणि पती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक व स्वतःला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेचे स्कूल बसचा चालक असलेल्या व्यक्तीसोबत सूत जुळले आणि शिक्षिकेने सुखी परिवार सोडून त्या दोघांनी पलायन केले. तब्बल वर्षभरानंतर त्यांचा शोध लागला पण त्यांनी कोकणात लग्न करून पुन्हा नव्याने पुणे इथे संसार थाटला होता आणि ही शिक्षिका तिच्या नव्या पतीपासून नऊ महिन्यांची गर्भवती होती. इकडे पती आणि तिच्या आईवडिलांनी तिचा शोध लागावा म्हणून पार मुख्यमंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले मात्र अखेर शोध लागून देखील त्याचा काही उपयोग झाला नाही. An English medium teacher from Jamner in Jalgaon district absconded with the driver

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेली शिक्षिका येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरीला होती. तिचे पती जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत आणि पोटी दहा वर्षाचा मुलगा देखील आहे. दोघांचा संसार अतिशय आनंदात आणि सुरळीत चालू होता. ही शिक्षिका ज्या शाळेत नोकरीला होती त्या शाळेची बस विद्यार्थी व शिक्षकांना घ्यायला व सोडायला रोज येत-जात होती. याच दरम्यान या शिक्षिकेचे 29 वर्षीय अविवाहित असलेल्या तरुण चालकाशी सूत जुळले. तब्बल तीन वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते याच दरम्यान त्यांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली तरीदेखील कोणालाच ह्या प्रकाराची कल्पना आली नाही.

तरुण अविवाहित असल्याने त्याला काही अडचण नव्हती मात्र शिक्षिका विवाहित आणि पोटी मुलगा तसेच सधन घराण्यातील होती याचा कोणताही विचार न करता शिक्षिकेने या चालकासोबत गेल्यावर्षी पळ काढला होता. सदर प्रकरणाची तक्रार दाखल असल्याने तपास सुरू असताना संबंधित चालक आणि शिक्षिका पुण्यातील उत्तम नगर परिसरात वास्तव्यास असल्याचे आढळून आले. पोलिसांचे एक पथक मंगळवारी तिथे पोहोचले तर शिक्षिका नऊ महिन्यांची गर्भवती आणि चालक हा स्पेअर पार्टच्या दुकानावर कामाला होता. दोघांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी लग्न केल्याचा पुरावा सादर केला आणि शिक्षिकेने पोलिसांसोबत येण्यास नकार देऊन लेखी जबाब देखील लिहून दिला. दोघेही सज्ञान असल्याने पोलीस माघारी फिरले शिक्षिका व तिचा नवा पती हे दोघेही वेगवेगळ्या समाजाचे आहेत.

एक वर्षापूर्वी पत्नी गायब झाल्याने पतीने जामनेर पोलीस स्टेशन गाठून पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. पत्नी गायब झाल्यानंतर त्या दिवसापासून बसचालक देखील गायब झाला होता मात्र या दोघांमधील प्रेमप्रकरणाची कोणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी चालकानेच पत्नीला पळवण्याचे पतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला होता. शिक्षिकेचा शोध लागत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यापर्यंत वेळोवेळी अर्ज आणि तक्रारी सादर केल्या होत्या मात्रा अखेर तपास लागून देखील त्याचा काही उपयोग झाला नाही.


शेअर करा