
मित्र म्हणून हातउसने पैसे दिले मात्र पैशाची कुठलीच परतफेड करण्यात आली नाही अन अखेर प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आणि कोर्टाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यांची साधी कैद आणि नऊ लाख 18 हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , बळीराम बलराज शिरसुल ( राहणार पाईपलाईन हडको सावेडी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी तेजस्विनी निराळे यांनी हा निर्णय दिलेला आहे. एडवोकेट विक्रम वाडेकर यांनी फिर्यादी व्यक्ती यांच्या वतीने काम पाहिले होते.
शंकर बत्तीन ( राहणार भिस्तबाग सावेडी ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून केवळ मैत्री पोटी त्यांनी बळीराम याला हातउसने पैसे दिलेले होते. बळीराम याने त्यानंतर बँकेत पैसे नसताना देखील फिर्यादी यास चेक दिला आणि तो चेक बाउन्स झाला त्यानंतर बत्तीन यांनी वकिलामार्फत फिर्यादीस नोटीस पाठवली मात्र तरीही रक्कम दिली नाही म्हणून अखेर प्रकरण कोर्टात दाखल झालेले होते. वकिलांचा साक्षी पुरावा युक्तिवाद याच्या आधारावर बळीराम यास दोषी ठरविण्यात आलेले असून एडवोकेट अतिश निंबाळकर आणि एडवोकेट धैर्यशील वाडेकर यांनी एडवोकेट विक्रम वाडेकर यांना सहकार्य केले.