नेवासे तालुक्यात कालव्यात तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून नेवासे तालुक्यातील बालाजी देडगाव इथे मुळा धरणाच्या कालव्यात एका तरुणाच्या शरीराचे सात ते आठ तुकडे कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत सर्व विखुरलेले तुकडे ताब्यात घेतलेले असून तपासाला सुरुवात केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पाथर्डीकडे जात असलेल्या मुळा धरणाच्या कालव्यात सरपंच चंद्रकांत मुंगसे यांना मानवी अवयवाचा तुकडा असल्या प्रकरणी माहिती समजली त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . पंचांसमक्ष हाताचा तुकडा पूर्व दिशेला तर पाय आणि हाताचे दोन तुकडे आढळून आले तर एका गोणीमध्ये धड आणि डोके सापडलेले आहे. 

आरोपींनी काही दिवसांपूर्वी पाणी असताना खून केला आणि त्यानंतर शरीराचे तुकडे केलेली गोणी वाहत्या पाण्यात टाकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात असून शासकीय खर्चाने खून झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती धनंजय जाधव यांनी दिलेली असून नगर जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनलेली आहे. 


शेअर करा