जिजाऊ मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणात ‘ ते ‘ दोघेही निलंबित , भीती दाखवून लाच.. 

शेअर करा

मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडे एक कोटी रुपयांची लाच मागितली आणि त्यातील पहिला हप्ता पाच लाख रुपये एका व्यापाऱ्याकडे सुपूर्त करण्यास सांगितला . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे. 

बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हेड कॉन्स्टेबल रवीभूषण जाधवर अशी निलंबित करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर दोघेही फरार झालेले होते ते अद्यापपर्यंत ताब्यात आलेले नाहीत . 

बीड जिल्ह्यातील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट सध्या अडचणीत असून याप्रकरणी दाखल झालेल्या एका गुन्ह्यांमध्ये कारवाई न करण्यासाठी एका बिल्डरला पोलीस अधिकाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. इतकी रक्कम देणे शक्य होणार नाही असे बिल्डरने सांगितल्यानंतर त्यांच्यात तडजोड झाली आणि लाचेचा पहिला हप्ता एका व्यापाऱ्याकडे देण्याचे ठरले होते मात्र तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि कारवाई झाली.

कुशल प्रवीण जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यापाऱ्याचे नाव असून त्याने ही लाच आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि लाचेची मागणी करणारा हवालदार रवीभूषण जाधवर यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती याची कबुली दिलेली आहे मात्र दोन्ही पोलीस अधिकारी सध्या फरार झालेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे , अविनाश गवळी , भरत गारदे यांच्या पथकाने कारवाईसाठी सापळा रचला आणि संबंधित व्यापाऱ्याला ताब्यात घेतले आहे.


शेअर करा