मतदान न करणाऱ्या व्यक्तींबद्दल परेश रावल म्हणाले की ? 

शेअर करा

मुंबईत मतदान कमी होत असल्याचे दिसून येत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर दुसरीकडे अभिनेते  परेश रावल यांनी मतदार मतदान करण्यासाठी येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे.  जे मतदार मतदान करत नाही त्यांच्यावर टॅक्स वाढवण्यासारकाही कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. मूळचे गुजरातचे असलेले परेश रावल हे भाजपचे खासदार देखील राहिलेले आहेत.

परेश रावल म्हणाले की ? 

जे लोक मतदान करत नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचा टॅक्स वाढवला पाहिजे किंवा असं काही ना काही त्यांच्यासाठी असलं पाहिजे. तुम्ही म्हणता की सरकार हे काम करत नाही, ते काम करत नाही. जर तुम्ही आज मतदान केलं नाही तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. 

ज्या लोकांनी मतदान केलं नाही, ते जबाबदार असतील. त्यांच्यासाठी सरकार जबाबदार नाही. वाईट राजकीय नेते जन्माला येत नाहीत, तर ते बनवले जातात. ते अशा लोकांकडून बनवले जातात, जे मतदानाच्या दिवशी पिकनिकला, फिरायला जातात ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा