
‘ धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत जातीयवाद करत नाहीत असे वाटले होते मात्र मागील दोन चार दिवसात तेही समोर आलेले आहे. मराठ्यांच्या विरोधात ते पोस्ट करायला लावतात ‘ असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर इथे केलेला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की , ‘ मराठ्यांनी शांत राहावे भावनिक होऊ नये . गोपीनाथ मुंडे यांनी कधीही जातीवाद केला नव्हता. धनंजय मुंडे जातिवाद करत नव्हते असे वाटत होते मात्र काही दिवसांपासून ते देखील जातीयवाद करत असल्याचे दिसून येत आहे.’
मराठा समाजासाठी सगेसोयरेची अंमलबजावणी तात्काळ करा असे झाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासोबत सर्व समाज मैदानात उतरणार आहे. आमचा कुणालाही पाठिंबा नाही याला पाडायचे त्याला पाडा असे मी म्हणालो मात्र विधानसभेत थेट नाव घेऊन आरोप करणार आहे विरोध करणार आहे ‘ असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.