‘ ह्या ‘ कारणावरून मुंबईतील महिला बॅंकरच्या पतीचे केले होते अपहरण.. आरोपी नगर जिल्ह्यात धरले

शेअर करा

मुंबईत बोरीवलीतील गोराई परिसरात एका महिला बॅंकरच्या पतीचं भरदिवसा ‘बिहार स्टाईल ‘ अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्यांनी महिलेच्या पतीला कळवा येथील खाडीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असून अद्याप त्या आपत्तीचा शोध लागलेला नाही. सदर महिलेचा पती समाजसेवक म्हणून कार्यरत आहे. The husband of a woman banker in Mumbai was abducted. The accused was arrested in Nagar district

उपलब्ध माहितीनुसार , बोरीवलीतील गोराई येथे 3 तारखेला दिल्ली येथे बॅंकेत उच्चपदस्थ काम करणाऱ्या एका महिलेच्या पतीचं भरदिवसा दोन व्यक्तींनी अपहरण केलं. नंतर त्याला बेदम मारहाण करून जबरदस्तीनं दारू पाजून ठाणे जिल्ह्यातील कळवा खाडीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकरणातील आरोपीस रिक्षात जबरदस्तीनं बसवून अपहरण केल्याप्रकरणी 2 आरोपींना मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 11 ने (संगमनेर, जि.अहमदनगर) येथून अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा खाडीत पतीला फेकून दिल्यानंतर त्यांनी आधी नाशिक आणि नंतर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पळ काढला. मात्र मुंबई पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. त्यानुसार दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे.

अपहरण केलेली व्यक्ती ही आरोपींच्या परिचयाची होती. पाच वर्षांपूर्वी एकत्र दारु पित असताना महिलेच्या पतीनं अपहरणकर्त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरुन 3 नोव्हेंबरला दुपारी आरोपीनी महिलेच्या पतीचं अपहरण केलं. त्याला दारु पाजून खूप मारहाण केली. नंतर त्याला कळवा खाडीत (जि. ठाणे) ढकलून दिलं. नंतर दोन्ही आरोपी पुढे नाशिक आणि नंतर संगमनेर येथे पळून गेले. दरम्यान आरोपी ताब्यात आलेले असले तरी अपहरण झालेल्या व्यक्तीचा अजूनही ठांग पत्ता लागलेली नाही. कळवा खाडीच्या हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.


शेअर करा