‘ अवसायक ‘ फक्त प्रसिद्धीपत्रकापुरतेच का ? , नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची तातडीची बैठक

शेअर करा

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात संगमनेर इथून अटक करण्यात आलेला उद्योजक अर्थात आरोपी कर्जदार अमित वल्लभराय पंडित यास जामीन मंजूर करण्यात आलेला आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी त्यास अंतरिम जामीन मंजूर केलेला असून गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलीस कोठडीत होता. अमित पंडित याने सुमारे 33 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते आणि आत्तापर्यंत त्याच्याकडील थकीत रक्कम 40 ते 45 कोटी आहे

औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी त्याला जामीन दिलेला असून जामीन मिळताच पंधरा दिवसाच्या आत दोन कोटी रुपये आणि त्यानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत आठ कोटी 84 लाख 33 हजार रुपये त्यास भरावे भरावे लागणार आहेत .नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने 25 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राजेंद्र चोपडा यांच्या सथ्था कॉलनी येथील निवासस्थानी बैठक आयोजित केली असून  संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात अवसायक ढिलाई करत असल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा असून त्यासंदर्भात आगामी दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती डी.एम. कुलकर्णी यांनी दिलेली आहे . 

अमित वल्लभराय पंडित ( वय 56 ) याने स्वतःसोबत पत्नी , मुलगा आणि एका भागीदाराच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने कर्ज घेतले आणि त्याची परतफेड केली नाही. संगमनेर शहर पोलिसांनी 16 मार्च रोजी अमित पंडित यास राहत्या घरातून अटक केलेली होती. अमित पंडित याचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांमध्ये नाराजीचे वातावरण असून अमित पंडित याला आजारपणाचे कारण देत जामीन देण्यात आला मात्र दुसरीकडे नगर अर्बन बँकेचे अनेक ठेवीदार देखील वयोवृद्ध असून आजारी आहेत तसेच त्यांना उपचारासाठी देखील आर्थिक चणचण भासत आहे अशा परिस्थितीत न्यायालयाने एकतर्फी अमित पंडित याचा जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर ठेवीदारांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहेत . 

नगर अर्बन बँकेवर सध्या अवसायक यांची नेमणूक करण्यात आलेली असून अमित पंडित याने रक्कम भरल्यानंतर सर्वप्रथम ठेवीदारांच्या प्राथमिकतेवर लक्ष देऊन त्या अनुषंगाने आलेल्या रकमेचे ठेवीदारांमध्ये वाटप करणे नितांत गरजेचे आहे.  ठेवीदारांच्या गरजेनुसार प्राथमिकता ठरवण्यात यावी आणि त्यानंतर अवसायक यांनी प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशा पद्धतीने पावले उचलण्याची नितांत गरज आहे. आरोपींना तुरुंगात ठेवून ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळणार नाही तर ज्या आरोपींनी कर्जाची किंवा रकमेची विल्हेवाट लावली आहे किंवा संपत्ती खरेदी केलेली आहे त्याचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळवून देण्यासाठी अवसायक यांनी महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे मात्र अवसायक यांचीच भूमिका वेळकाढू असल्याचे आतापर्यंत घडत असलेल्या घडामोडीवरून दिसत आहे.


शेअर करा