सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या , कोण कोण दिग्गज मैदानात ? 

शेअर करा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार काल थांबलेला असून उद्या 25 तारखेला 57 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 

बिहारमधील आठ , हरियाणामधील दहा , झारखंड मधील चार , ओडिसा मधील सहा , उत्तर प्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील आठ तसेच दिल्लीतील सात मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडेल. 

केंद्रीय मंत्री सुभाष सरकार , माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय , भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी , उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल , काँग्रेस नेते कन्हैया कुमार, अभिनेते राज बब्बर , माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यासोबत तब्बल 889 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत कैद होईल


शेअर करा