वाणी नगरमधील ‘ त्या ‘ जागेबद्दल पत्रकार परिषद घेऊन खुलासा

शेअर करा

नगर शहरातील सावेडी परिसरातील वाणी नगर येथील शेतजमीन ही आम्ही रीतसर खरेदी केलेली आहे. जमिनीची सरकारी मोजणी देखील झालेली आहे मात्र स्थानिक महिला खोट्या तक्रारी करून संरक्षक भिंत बांधण्यास बेकायदेशीररित्या हरकत घेत आहे असा आरोप पवनकुमार अग्रवाल यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. 

पवनकुमार अग्रवाल म्हणाले की , ‘ वाणी नगर परिसरातील जमीन ही आम्ही शंकर वाणी यांच्याकडून सात डिसेंबर 1992 मध्ये खरेदी केलेली होती. लीलावती नंदकिशोर अग्रवाल यांच्या नावाने ही खरेदी झाली आणि मिळकतीची रीतसर नोंद देखील झाली त्यानंतर वारसा हक्काने पवनकुमार अग्रवाल , हेमलता प्रकाश अग्रवाल व इतर यांची नावे वारसा हक्काने लागली आहेत. 

मध्यंतरीच्या काळात पोलीस संरक्षणात मोजणी देखील झाली आणि त्यानंतर हद्दीच्या खुणा देखील निश्चित करण्यात आल्या मात्र आता संरक्षण भिंत बांधण्यासाठी अडथळा आणला जात आहे. सशुल्क पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील आम्ही अर्ज केलेला आहे असे ते पुढे म्हणाले . 


शेअर करा