गुजरातच्या ‘ त्या ‘ तिघांनी दिला दगा , नगरच्या व्यापाऱ्याचे इतके लाख लंपास

शेअर करा

नगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून शेअर मार्केटमध्ये जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथील तीन जणांनी नगर येथील व्यापाऱ्याची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीचा आकडा सुमारे 11 लाख असून कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अर्जुन विठोबा शिंदे ( राहणार सुपा तालुका पारनेर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ते ऑनलाइन ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. अहमदाबाद येथील आरव पटेल , निलेश पटेल आणि चिराग पटेल या तीन जणांनी शिंदे यांच्यासोबत बोलून त्यांचा विश्वास संपादन केला आणि आमच्यासोबत शेअर ट्रेडिंग करा असे सांगत नफ्याचे गणितही समजून सांगितले. 

फिर्यादी आरोपींच्या जाळ्यात अडकले आणि त्यानंतर 19 जानेवारीपासून तर 11 मार्चपर्यंत वेळोवेळी माळीवाडा परिसरात त्यांना सुमारे अकरा लाख रुपयांची रक्कम शेअर मार्केटमध्ये अडकवण्यासाठी दिली. शिंदे यांनी गुंतवणुकीचा परतावा मागितला त्यावेळी त्यांना कुठलीच रक्कम देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच कोतवाली पोलिसात फिर्यादी यांनी धाव घेतलेली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पुढील तपास करत आहेत.


शेअर करा