गिन्नी गवतातून आला अन घेऊन गेला , राहुरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे समोर आलेली  असून गुरुवारी सकाळी घराजवळ खेळत असलेल्या एका तीन वर्षांच्या बालिकेला बिबट्याने उचलून नेले आणि त्यानंतर रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , वेदिका श्रीकांत ढगे ( वय तीन वर्ष राहणार वरवंडी ) असे मयत बालिकेचे नाव असून आई-वडील शेतीचे काम करत असताना ती शेताच्या पायवाटेच्या रस्त्यावर एकटीच खेळत होती . गिन्नी गवतात लपलेला बिबट्या बाहेर आला आणि त्याने तिच्या मानेला पकडून गवतात ओढून नेले. 

आई-वडिलांनी आरडाओरडा केला त्यानंतर बिबट्याने तिला सोडून शेतातून पळ काढला. तिला आई-वडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिला नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केलेला असून गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचा उपद्रव वाढलेला पाहायला मिळत आहे.


शेअर करा