पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ माय डियर फ्रेंड ‘ म्हणून कौतुक केलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलेले असून गुपिते न फोडण्यासाठी चक्क एका पॉर्नस्टार महिलेला पैसे दिले आणि त्याची नोंद सरकारी खर्चात केली असे हे प्रकरण आहे. एकूण 34 गुन्ह्यांमध्ये मॅनहटन न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे 2016 मध्ये अध्यक्ष निवडणुकीसाठी रिंगणात असताना एका पॉर्नस्टारसोबत असलेल्या संबंधाबद्दल बोलू नये म्हणून ट्रम्प यांच्या वकिलांनी तिला एक लाख तीस हजार डॉलर दिलेले होते त्यानंतर एका वृत्तपत्राने ही बाब उघड केली आणि व्यवहाराच्या नोंदी लपवण्यासाठी ट्रम्प यांनी चक्क आर्थिक नोंदीत फेरफार करत हा पैसा कायदेशीर बाबींसाठी म्हणून दाखवला.
निवडणूक कायद्याचा यामुळे भंग झाला असा दावा सरकारी पक्षाच्या वकिलांकडून मॅनहटन न्यायालयात करण्यात आलेला होता. 12 न्यायाधीशांच्या न्यायमंडळाने अखेर ट्रम्प यांना दोषी ठरवलेले असून 22 साक्षीदारांची साक्ष यामध्ये तपासण्यात आली. सदर पॉर्नस्टार हिचे ट्रम्प यांच्यासोबत लैंगिक संबंध होते. कोर्टरूमच्या बाहेर येताच ट्रम्प यांनी हेराफेरी आणि लाजिरवाणी सुनावणी असल्याचा आरोप केला आणि खरा निकाल आता निवडणुकीतून स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.