बॉयफ्रेंड दुसरीकडे लग्न करणार असल्याचं कळताच प्रेयसीने शिकवला ‘ असा ‘ धडा , कुटुंबीय धास्तावले

  • by

लग्नाचे वचन त्याने तरुणीला दिले होते मात्र हळूहळू त्यात बदल होत गेला आणि त्याने दुसरीकडे लग्न जमवण्याचा घाट घेतला मात्र बॉयफ्रेंडला त्याच्या प्रेयसीने चांगलाच धडा शिकवला.आपला बॉयफ्रेंड हा दुसरं लग्न करणार असल्याचं कळताच तरुणी थेट त्याच्या घरीच गेली आणि घराबाहेर आंदोलनाच बसत ठाणच मांडलं. त्या तरुणाचं 8 नोव्हेंबरला लग्न आहे मात्र तरुणीने चक्क त्याच्या घरासमोरून मी हटणारच नाही असा निश्चयच केल्याने तरुणाचे कुटुंबीय देखील धास्तावलेले आहेत. बातमी उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील आहे. When she found out that her boyfriend was going to marry someone else, she started fasting in front of his house

या तरुणाचं आणि तरुणीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचं आमिष दाखवून चार वर्ष माझा वापर केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे. मात्र लग्न करण्याच्या तो फक्त थापा देत होता असा आरोपही तिने केलाय. आपला मुलगा हरियाणात नोकरी करतो आणि तो गेल्या महिनाभरापासून तो घरी आलेला आहे असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे तरुणी दारापुढून हलायला तयार नाही .

तरुण दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं कळताच ती थेट त्याच्या घरी गेली आणि जाब विचारला. मुलाच्या कुटुंबीयांनी तिला घराच्या बाहेर काढले, मात्र ती थेट आंदोलनालाच बसली. आता लग्न होणार असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनाही ही घटना कळाल्याने त्यांनीही फेरविचाराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.आंदोलनाला बसलेली तरुणी मागे हटायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी तिची समजूत काढली मात्र ऐकायलाच तयार नसल्याने आता तोडगा कसा काढायला असा पेच सगळ्यांनाच पडला आहे. तर ही तरुणीच खोट बोलत असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.