
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी , ‘ उत्तरेतील महायुतींच्या राजकीय नेत्यामधील राजकारणामध्ये माझा पराभव झाला अन माझी जिरली आणि दक्षिणेत त्यांची देखील जिरली ‘, असे म्हटलेले आहे
सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पराभवाविषयी बोलताना म्हटले की , ‘ फार थोड्या मतांनी माझा पराभव झालेला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अकोला आणि संगमनेरच्या धर्तीवर मला मताधिक्य मिळाले असते तर माझा विजय नक्की होता मात्र काळे कोल्हे परिवारात एकमेकांची जिरवण्याच्या नादात माझी जिरली ,’ असे देखील ते पुढे म्हणाले.