देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक, फोडाफोडीची संस्कृती त्यांनीच.. 

शेअर करा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केलेली असून , ‘ महाराष्ट्र हा राजकीय सुसंस्कृतपणासाठी ओळखला जायचा मात्र फडणवीस यांनी राजकीय घराणे आणि पक्ष फोडण्याचे काम केले आणि या सुसंस्कृतपणाला तुरुंग लावला राज्याच्या राजकारणातील ते खलनायक आहेत ,’ असे म्हटलेले आहे

नवी दिल्ली इथे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी संजय राऊत आलेले होते त्यावेळी ते म्हणाले की ,’ राजकारण हे वैचारिक पातळीवर लढले पाहिजे मात्र फडणवीस यांनी फोडाफोडीची संस्कृती महाराष्ट्रात रुजवली आणि त्यासाठी चक्क महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील वापर केला. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांच्या विरोधात निकाल देण्यासाठी न्यायाधीशांना धमक्या द्यायच्या असेही प्रकार त्यांनी केलेले आहेत म्हणूनच जनतेने फडणवीस यांना धडा शिकवला आहे ‘, असे म्हटलेले आहे . 


शेअर करा