ज्ञानराधा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे यास पुण्यातून अटक , काय आहे प्रकरण ? 

शेअर करा

ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवले आणि त्यांची त्यांच्या ठेवी परत केल्या नाहीत म्हणून ज्ञानराधा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. पुण्यातील हिंजवडी भागातून त्यांना अटक करण्यात आलेली असून माजलगाव पोलिसांकडे त्यांना सोपवण्यात आले आहे. कुटे यांच्यासोबत तब्बल नऊ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुमारे 52 शाखा असून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात त्यांच्या मल्टीस्टेटने आपले जाळे पसरवलेले होते. सहा लाखांपेक्षा अधिक या मल्टीस्टेटचे ग्राहक असून अनेक जणांनी कुटे यांच्यावर विश्वास असल्याकारणाने या ठेवी ठेवलेल्या होत्या. ऑक्टोबर 2023 मध्ये आयकर विभागाकडून कुटे ग्रुपची चौकशी झाली त्यानंतर काहीजणांनी थवी काढून घेतल्या मात्र अनेक जणांच्या ठेवी अद्यापही या संस्थेत अडकलेल्या आहेत. 

आपली रक्कम परत मिळावी म्हणून ठेवीदारांनी अनेकदा आंदोलने केली मात्र काहीच प्रगती झाली नाही म्हणून अखेर कोर्टात प्रकरण पोहोचले आणि न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हे दाखल झाल्यानंतर कुटे यांच्याकडून सोशल मीडियावरून पैसे परदेशातून पैसे येत असल्याचे आश्वासन देत वेळ मारून नेली जात होती. 

एक जून नंतर अखेर पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसली आणि पुण्यातील हिंजवडी परिसरातून कुटे यास अटक करण्यात आली. कुटे यांच्यासोबत आणखीन एक संचालक देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अद्यापही सुरेश कुटे ‘ काही दिवस थांबा..मी तुमचे पैसे परत करतो ‘ असे म्हणत आहे. 


शेअर करा