![](https://nagarchaufer.com/wp-content/uploads/2023/09/women-crime-beated-2.jpg)
महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना लातूरमध्ये समोर आलेली असून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अपमान करणारी वागणूक मिळाली आणि त्यातून अखेर महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लातूरमधील विवेकानंद पोलीस चौकीत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केलेला असून याप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपीना सुनावण्यात आलेली आहे.
अनिता बालाजी लष्करे ( वय 30 वर्ष राहणार विठ्ठल नगर लातूर ) या महिलेला नवऱ्यासोबत सहा जणांनी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून अनिता या विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही आणि त्यांना हाकलून दिले. हा अपमान सहन न झाल्याने अनिता यांनी बाभळगाव रोड परिसरातील एका विहिरीत उडी मारली त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपमानकारक वागणूक दिली म्हणून आपल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले असे तक्रारदार व्यक्ती अर्थात अनिता यांच्या वडिलांचे म्हणणे आहे.
विवेकानंद पोलीस चौकी पोलीस ठाण्यामध्ये सुभाष गंगाराम लष्करे , बाळू गंगाराम लष्करे रावसाहेब गंगाराम लष्करे , राजू गंगाराम लष्करे , सुरेश मारुती लष्करे ,राहुल बाळू लष्करे ( सर्वजण राहणार विठ्ठल नगर लातूर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. दुसरीकडे ज्यावेळी महिला पोलीस ठाण्यात आलेली होती त्यावेळी तिच्यासोबत व्यवस्थित वर्तन केले नाही म्हणून पोलीस कर्मचारी रतन शेख याला निलंबित करण्यात आलेले आहे.