‘  फुकट आंबे दिले नाहीत म्हणून..’, राहुरीत फळविक्रेत्याला गाठलं आणि.. 

शेअर करा

किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण सध्या नगर जिल्ह्यात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार राहुरीत समोर आलेला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ येथे फुकट आंबे दिले नाहीत म्हणून एका फळविक्रेत्याला लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली आहे सोबतच त्याच्याकडे 70000 रुपये आणि तीन ग्रॅमचा सोन्याचा दागिना लंपास करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राहुल बापू मोरे , अनिल संजय घोरपडे अशी अटक केलेल्या दोन जणांची नावे असून त्यांचे इतर दोन साथीदार फरक झालेले आहेत. पुंडलिक नारायण मासरे असे जखमी झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव असून राहुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा