ट्रॅक्टरच्या व्यवहारात नगरमध्ये व्यावसायिकाला चुना , कोतवालीत गुन्हा दाखल

शेअर करा

नगरमध्ये फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार समोर आलेला असून डाऊन पेमेंट भरल्यानंतर खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे उर्वरित सव्वा सहा लाख रुपये न भरता एका व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आली. कोतवाली पोलिसात दोन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , हेमंतकुमार अरुण ठुबे ( वय 38 राहणार कल्याण रोड ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ज्ञानेश्वर हिरामण पवार ( तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ) आणि अनिल जाधव ( राहणार वळण तालुका राहुरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

फिर्यादी यांचे नगर कल्याण रोडवर ट्रॅक्टरचे शोरूम असून अनिल जाधव यांनी यापूर्वी फिर्यादी यांच्याकडून पाच ट्रॅक्टर ऊसतोड कामगारांच्या नावाने घेतलेले होते. त्याचे डाऊन पेमेंट त्याने फायनान्स करून केले त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास बसलेला होता. 

अकरा मे 2023 रोजी अनिल जाधव याने आणखीन एक ऊसतोड कामगार असलेला ज्ञानेश्वर पवार याला पुढे केले आणि त्यानंतर शोरूम मधील सात लाख 50 हजार रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी केला आणि एक लाख वीस हजार रुपये डाऊन पेमेंट देखील भरले. उर्वरित असलेली रक्कम सहा लाख तीस हजार रुपये फिर्यादी यास दिली नाही आणि फायनान्स देखील काही केला नाही त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलेले आहे. 


शेअर करा