भाजपच्या दिग्गज नेत्यावर भाजप कार्यालयातच महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप

शेअर करा

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीकडून लावण्यात आलेले असून अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  

काँग्रेसने त्यानंतर पत्रकार परिषद घेत अमित मालवीय यांच्या बडतर्फीची मागणी केलेली असून लैंगिक शोषणाच्या सर्व प्रकरणात आरोपी भाजपशी संबंधित कसे आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. आरएसएसचे पदाधिकारी शंतनु सिन्हा यांनी हे आरोप केलेले असून सिन्हा हे भाजपचे नेते राहुल सिन्हा यांचे चुलत भाऊ आहेत. 

सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अमित मालवीय यांच्यावर गंभीर आरोप करत हे आरोप काही काँग्रेसने लावलेले नाही तर आरएसएसकडून लावण्यात आलेले आहेत . शंतनु सिन्हा यांच्या ट्विटमध्ये म्हणण्याप्रमाणे ,’ अमित मालवीय कोलकाता के फाइव स्टार होटल में अभी भी इंतजार कर रहे हैं कि बंगाल की सरकार कब सुंदर लड़कियों को देगी? क्या बंगाल के नेतृत्व के बीच यह प्रतियोगिता अब नहीं रह गई है कि कौन कितनी सुंदरियों से अध्यक्ष बनेगा? कृपया प्रतिस्पर्धा करें और अपने कार्यकर्ताओं और समर्थकों के साथ खड़े हों। अध्यक्ष या सचिव पद के लिए अमित मालवीय या दिल्ली से भेजे गए पर्यवेक्षकों को सुंदर लड़कियों की पेशकश करने की कोशिश नहीं करें। ‘ असे म्हटलेले आहे . अमित मालवीय यांनी केवळ पंचतारांकित हॉटेलच नव्हे तर भाजपच्या कार्यालयात देखील महिलांचे लैंगिक शोषण केले असे देखील शंतनु सिन्हा यांनी म्हटलेले आहे. 

सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपच्या नेत्यांकडूनच महिलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे का बाहेर येत आहेत असा प्रश्न विचारत यापूर्वी देखील महिला खेळाडूंचे प्रकरण , अंकिता भंडारी प्रकरण , उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरण याविषयी संताप व्यक्त करत अमित मालवीय यांस तात्काळ भाजपच्या आयटी सेलमधून निलंबित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. आरोप झाल्यानंतर शंतनू सिन्हा यांचे ट्विटर अकाउंट सद्य परिस्थितीत आढळून येत नाही मात्र त्याचे काही स्क्रीन शॉट सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत. 


शेअर करा