तिसरा दिवस..मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या नक्की काय आहेत ? 

शेअर करा

पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील यांनी आठ तारखेपासून उपोषणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे चार जून रोजी उपोषण करणार होते मात्र आचारसंहिता आणि निवडणुकीचे कारण देत पोलिसांनी उपोषणासाठी परवानगी नाकारली त्याचवेळी त्यांनी आठ जून रोजी आपण उपोषणाला बसणार गोळ्या घातल्या तरी चालेल , असे प्रशासनाला बजावलेले होते त्यानुसार त्यांनी आठ जूनला उपोषणाला सुरुवात केलेली आहे . 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ राजकारण माझा धर्म नाही पण मागण्या मंजूर झाल्या नाही तर सर्व समाज बांधवांना घेऊन विधानसभेच्या 288 जागांवर आपण उमेदवार उभे करणार आहोत. मी मराठा आरक्षणासाठी आठ महिन्यांपासून उपोषण आंदोलन करत आहे. सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि विविध संस्थांचे गॅजेट स्वीकारणे यासाठी आपण उपोषणाला बसलेलो आहे. सरकारने मराठा समाजाचा रोष पत्करू नये ,  असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा