..म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला नाही , उपमुख्यमंत्री पदासाठी हे नाव होत चर्चेत 

शेअर करा

महाराष्ट्रात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केलेला होता त्यावर अमित शहा यांनी चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप तयार करून कामाला लागा तूर्तास उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नका ‘ अशा सूचना दिलेल्या आहेत

लोकसभा निवडणुकीत निराशाजनक पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी राजीनामा देण्यासंदर्भातले वक्तव्य केलेले होते त्यानंतर फडणवीस यांनी अमित शहा यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्यांची भेट घेतली त्यावेळी अमित शहा यांनी त्यांना पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश दिलेले असून फडणवीस आता राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झालेले आहे . 

अमित शहा यांनी त्यांना राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल त्यामुळे तूर्तास थांबा असा सल्ला दिलेला असून फडणवीस यांच्या जागी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री होणार अशी ही चर्चा होती मात्र फडणवीस आता राजीनामा देणार नसल्याकारणाने गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याचा मार्ग बंद झालेला आहे. 


शेअर करा