नरेंद्र मोदींच्या शपथविधीला 24 तास उलटायच्या आतच आली मोठी बातमी

शेअर करा

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एनडीएमधील अंतर्गत मतभेद समोर आलेले असून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टीकडून लोकसभेच्या स्पीकरपदाची मागणी करण्यात आलेली आहे. भाजपकडून त्यांच्या या मागणीवर कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नसली तरी आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनी तेलगु देशम पार्टीच्या या भूमिकेचे स्वागत केलेले आहे. 

संजय सिंह यांनी टीडीपीने हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला असल्याचे म्हटलेले आहे सोबतच जर लोकसभा स्पीकर भाजपचा असेल तर पक्ष फोडले जातील. खासदारांना सस्पेंड केले जाईल आणि संविधानाची पायमल्ली केली जाईल असे ट्विटमध्ये  म्हटलेले आहे. भाजपकडून जर हा प्रस्ताव मान्य झाला नाही तर इंडिया आघाडीने टीडीपीच्या या मागणीवर विचार करावा असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे. 


शेअर करा