पत्नीबद्दल अपशब्द उच्चारल्याने दगडानं ठेचलं , उपराजधानीतील घटना

शेअर करा

दारू पिल्यानंतर पत्नीबद्दल मित्राने अपशब्द उच्चारले म्हणून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा खून केलेला आहे. नागपूर येथील ही घटना असून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात तारखेला हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , धवल पांडुरंग नाटकर ( वय 33 वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव असून अंकुश गणेश आखरे ( वय 33 असे आरोपीचे नाव आहे दारू पिण्यासाठी दोघे मित्र वसलेले असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यावेळी मयत व्यक्ती याने आरोपीच्या पत्नीबद्दल अपशब्द उच्चारले म्हणून आरोपीने अंकुश याने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला 


शेअर करा