राहुरीत बिबट्याचा उपद्रव सुरूच , रात्री गोठ्यात शिरला अन.. 

शेअर करा

राहुरी तालुक्यात बिबट्याचा उपद्रव सातत्याने सुरू असून पिंपरी अवघड इथे शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये हल्ला केला आणि दोन शेळ्यांना आपले प्राण गमवावे लागले. 

उपलब्ध माहितीनुसार , किशोर दशरथ मोरे आणि दत्तात्रेय कारभारी लांबे ( दोघेही पिंपरी अवघड ) येथील शेतकरी असून शेतीसोबत शेळीपालन करून कुटुंबाची उपजीविका करतात. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास बिबट्या त्यांच्या गोठ्यामध्ये शिरला आणि दोन्ही गोठ्यातील एक एक शेळी बिबट्याने ठार केली. राहुरी परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढला असल्याकारणाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. 


शेअर करा