‘ नीट ‘ निकाल प्रकरणावर राहुल गांधींचे विद्यार्थ्यांना आश्वासन , म्हणाले की.. 

शेअर करा

‘ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा असलेली नीट यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित्ता झालेली असून विद्यार्थ्यांची बाजू संसदेत मांडू ‘ असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पूर्ण होण्यापूर्वीच नीटचा हा प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी , ‘ अजून पंतप्रधानपदाची शपथही घेतली नाही त्याआधीच 24 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उध्वस्त करणारा नीट परीक्षा गैरप्रकार समोर आला. एकाच परीक्षा केंद्रातील सात विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. किती जणांना असे गुण मिळतात ? . पेपर फुटत असल्याची बाब सातत्याने सरकार नाकारत आहे, ‘ असे देखील असे म्हटलेले आहे. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की , ‘ शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणांमध्ये संगनमत असल्याशिवाय हे शक्य होऊ शकते का? यातून मुक्त होण्यासाठी काँग्रेसने एक चांगली योजना आखली होती. विद्यार्थ्यांना पेपर फुटीच्या जंजाळातून मुक्ती देण्यासाठी कायदा करण्याचे देखील आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिलेले होते. मी विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की संसदेमध्ये विद्यार्थ्यांशी निगडित समस्या ठामपणे मांडेल ‘, असे म्हटलेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडून देखील याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे.


शेअर करा