कंगना राणावतच्या ‘ कानाखाली बसली ‘ , कुलविंदर कौर प्रकरणात नवीन माहिती समोर

शेअर करा

भाजप खासदार कंगना राणावत यांच्या कानाखाली वाजवणारी सीआयएसएफची महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून तिने तिच्या नावाने केलेल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये , ‘ मला नोकरीची चिंता नाही आईच्या सन्मानासाठी अशा हजारो नोकऱ्यांवर पाणी सोडायला मी तयार आहे ‘ असे म्हटल्याचे एक ट्विट व्हायरल झालेले होते मात्र ज्या अकाउंटवरून हे ट्विट व्हायरल झाले ते अकाउंटच बनावट असल्याचे समोर आलेले आहे. 

सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या कंगना राणावत सध्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या असून त्याआधी त्या बॉलीवूडमध्ये कार्यरत होत्या. बॉलीवूडमध्ये असताना सातत्याने वादग्रस्त विधाने करायची अशी त्यांची शैली राहिलेली असून शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांनी शेतकरी आंदोलनातील महिला 100 रुपयात येतात असे ट्विट केलेले होते. त्यांनी सदर ट्विटबद्दल माफी मागावी अशी देखील शेतकरी आंदोलकांनी त्यांना विनंती केली मात्र त्यांनी कुठलीही माफी मागितली नाही. 

कंगना राणावत चंडीगड येथील एअरपोर्टवर आलेल्या असताना कुलविंदर कौर यांनी कंगना राणावतच्या यांच्या कानाखाली वाजवली त्यानंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलेल्या असून निलंबित करण्यात आल्यानंतर काही तासांच्या आत बॉलीवूड निर्माते विशाल ददलानी यांनी कुलविंदर कौर यांना आपण नोकरी देऊ असे देखील म्हटले होते. 

कंगना राणावत यांच्या कानाखाली वाजवल्यानंतर बॉलीवूडमधून देखील कोणीही कंगना राणावत यांच्या समर्थनार्थ म्हणून पुढे आलेले नाही. झाल्या गोष्टीचा निषेध केलेला आहे मात्र कंगना राणावत यांना संपूर्ण समर्थन कोणी दिलेले नाही त्यावरून देखील कंगना राणावत सध्या भडकलेल्या आहेत.


शेअर करा