श्रीरामपूर तालुक्यात बेरोजगारीला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक दुर्दैवी अशी घटना श्रीरामपूर तालुक्यात समोर आलेली असून भोकर येथील एका तरुणाने बेरोजगारी आणि गरिबीला कंटाळून अखेर राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , कैलास भाऊसाहेब डुकरे ( वय 30 वर्ष ) असे मयत तरुणाचे नाव असून कैलास यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलेले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झालेले होते. कैलास याच्या पाठीमागे आई-वडील , पत्नी , भाऊ भाऊजई , चार मुली आणि मुलगा असा परिवार आहे. 


शेअर करा