राहुल झावरे यांच्यावरील हल्ल्याचा अहमदनगर बार असोसिएशनकडून निषेध , केली ही मागणी

शेअर करा

निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अहमदनगर बार असोसिएशनकडून निषेध करण्यात आलेला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात केलेली आहे. पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. 

अहमदनगर बार असोसिएशनचे सहसचिव संजय सुंबे , सुरेश लगड आणि वकिलांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात पोलिसांना निवेदन दिलेले असून झाल्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत असे म्हटलेले आहे. राहुल झावरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोपी खुलेआम फिरत आहेत त्यांना अटक करावी असे देखील निवेदनात म्हटलेले आहे. 


शेअर करा