ट्रॅक्टरचे सरकारी अनुदान मिळून देतो , कृषी विभागातील पर्यवेक्षक जाळ्यात

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथे समोर आलेला असून ट्रॅक्टरचे सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारताना कृषी विभागातील पर्यवेक्षक व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे. जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बापू एकनाथ रोकडे ( वय 57 राहणार जुन्नर ) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तक्रारदार शेतकरी यांना लॉटरी पद्धतीने सरकारी अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर करण्यात आलेला होता त्यानंतर त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता फिर्यादी यांनी केली मात्र अनुदान मिळवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपयांची लाचेची मागणी त्यांनी केलेली होती. तक्रारदार यांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला आणि रोकडे यास रंगेहात पकडण्यात आले. 


शेअर करा